‘प्रत्येक नागरिकाला मोफत लस द्या !’ राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

Rahul Gandhi

नवी दिल्ली :- कोरोनाच्या (Corona) या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला गंभीर परिस्थितीत टाकले आहे. रुग्णालयात बेड्स नाहीत, ऑक्सिजन (Oxygen) नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राणाला मुकावे लागले. तसेच लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्याचबरोबर लसींच्या किमतींवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यावरून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandi) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाची लस मोफत मिळाली पाहिजे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

“चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे. बस एवढंच… भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका. ” असे टीकास्त्र त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सोडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button