सदाबहार गाण्यांचे गीतकार योगेश यांचं निधन; लतादीदींच भावनिक ट्विट

Yogesh Gaur

‘जिंदगी कैसी है पहेली हाए’, ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ अशा सदाबाहार गाण्याचे ज्येष्ठ गीतकार योगेश गौर यांचं आज (30 मे) सकाळी निधन झालं. मुंबईतील गोरेगावमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. योगेश गौर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते 77 वर्षांचे होते आणि अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि काही वर्षांपूर्वी त्यांचे किडनीशी निगडीत शस्त्रक्रियाही झाली होती.

विनम्रतेशिवाय लोकांची मदद करण्यासाठी कायम तत्पर असणं हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्वीट करुन योगेश यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “मनाला भिडणारी गाणी लिहिणाऱ्या योगेशजी यांचं निधन झाल्याचं मला नुकतंच समजलं. मला अतिशय दु:ख झालं. योगेशजी यांनी लिहिलेली गाणी मी गायली आहेत. योगेशजी अतिशय शांत आणि मधुर स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते.”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER