अखेर बाईक रुग्णावाहीका ठाणेकरांच्या सेवेत दाखल

बाईक रुग्णावाहीका

ठाणे :  वाहतूक कोंडीत मार्ग काढत रस्ते अपघातात वेळेवर मदत मिळावी यासाठी ठाण्याच्या रस्त्यावर बाईक रुग्णावाहिका धावण्याचा मार्ग अखेर बुधवार पासून मोकळा झाला आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते 15 रुग्णावाहीका बाईकचा लोकार्पण सोहळा पार पडला.

ठाण्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे दिवसेंदिवस वाहनांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. विशेष करून घोडबंदर पट्ट्यात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. एखाद्या रु ग्णाला जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर जीव जाण्याची देखील शक्यता असते. ब:याच वेळा वाहतूक कोंडीमधून मार्ग काढत अपघाताच्या ठिकाणी रु ग्णवाहिकेला पोहचण्यास उशीर होत असल्याने अपघात ग्रस्त व्यक्तीचे प्राण जातात.

यावर उपाय म्हणून ठाणे पालिकेच्या वतीने बाईक रु ग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बाईक रु ग्णवाहिकेमुळे अपघाताच्या ठिकणी प्राथमिक उपचार मिळणार आहे. आणि चार चाकी वाहनांप्रमाणो वाहतूक कोंडीत अडकणार नसल्याने वेळेत उपचार मिळणार आहे. परंतु त्या केवळ दोघ विभागांमधील अंतर्गत मतभेदामुळे या रुग्णवाहीका रस्त्यावर धावण्यास विलंब झाला होता.

या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली असून बुधवारी या रु ग्णवाहिकांना पालिका मुख्यालयात महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.