अखेर सचिन वाझेंची उचलबांगडी, गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली

Sachin Vaze

मुंबई : मनसुख हिरेन (Masukh Hiren) मृत्यू प्रकरणात संशयाच्या जाळ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. वाझेंची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली. काल रात्री पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश जारी करण्यात आलेत. सचिन वाझे आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत होते.

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे चांगलेच गोत्यात सापडले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन हे होते. मात्र तपास सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे विरोधी पक्षांनी हिरेन यांच्या मृत्यूचा संशंय थेट सचिन वाझे यांच्यावर घेतला आहे. याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले होते. त्यावरुन राज्य सरकारवर टीका झाली होती. या सर्व प्रकरणावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER