पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदींच्या नावालाच पसंती, एबीपी न्यूजच्या सर्व्हेत उघड

नवी दिल्ली : मोदी सरकारने सलग ७ वर्षे वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सी-व्होटर्सनने( survey of ABP News) महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरुन देशातील जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी सी-व्होटरने एक सर्वेक्षण केलं आहे. यात जनतेला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक प्रश्नही विचारला गेला की पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi)कॉंग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह या प्रश्नासाठी बर्‍याच मोठ्या नेत्यांची नावे जनतेसमोर ठेवली गेली.

जनतेला विचारण्यात आलेले प्रश्न…

तुमच्या मते पंतप्रधान पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती कोण?

नरेंद्र मोदी- ४४.१४ टक्के
राहुल गांधी – १२.३६ टक्के
सोनिया गांधी – २.९१ टक्के
मनमोहन सिंह- ६.५५ टक्के
योगी आदित्यनाथ – १.२२ टक्के
ममता बॅनर्जी – 0.३४ टक्के
अरविंद केजरीवाल – ३.८५ टक्के
इतर- १३. ७६ टक्के
सांगता येत नाही – १४.८७ टक्के

अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकीकडे टीका होताना दिसत आहे. दुसरीकडे पंतप्रधान म्हणून आजही नरेंद्र मोदी यांनाच लोकांची पसंती आहे.

तुम्हाला थेट पंतप्रधान निवडीची संधी दिल्यास राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यापैकी कुणाला निवडणार?

नरेंद्र मोदी – ५४.०५ टक्के
राहुल गांधी – २५.३४ टक्के
यापैकी नाही – ११.१५ टक्के
सांगता येत नाही – ९.४६ टक्के

टीप – मोदी सरकारनं सगळं ७ वर्षे पूर्ण केली आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी माझासाठी सी व्होटरनं देशाचा मूड जाणून घेतला. आजचा हा सर्व्हे देशभरात १ जानेवारी ते २८ मे दरम्यान घेतला गेला. या सर्व्हेत १३९१९९ लोकांची मतं जाणून घेतली. सर्व्हेमध्ये सर्व ५४३लोकसभा मतदारसंघातील लोकांची मतं जाणून घेतली गेली. देशाचा मूडमधील पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस ३ ते प्लस मायनस ५ टक्के असू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button