आजही अमिताभकडे आहेत मोठे प्रोजेक्ट

गेली चार-पाच दशके आपल्या अभिनयाने प्रक्षकांना मंत्रमुग्ध करणारे अमिताभ बच्चन वयाच्या सत्त्याहत्त्तरीतही कार्यरत आहेत. मुलगा अभिषेक किंवा अन्य कुठल्याही तरुण नायकापेक्षा त्यांच्याकडे जास्त चित्रपट आहेत. त्यांचे समवयस्क घरात नातवंडांबरोबर खेळण्यात व्यस्त असताना अमिताभ मात्र तोंडाला रंग लावून कॅमे-यासमोर उभे राहाणे पसंत करतात. यातील अनेक चित्रपटांचे लॉकडाऊनमुळे शूटिंग करणे शक्य झालेले नाही. त्यांच्याकडे यावेळी असलेल्या मोठ्या प्रोजेक्टवर एक नजर

ब्रह्मास्त्र- रणवीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत करण जोहर द्वारा निर्मितआणि अयान मुखर्जी द्वारा दिग्दर्शित हा एक सुपरहीरोपट आहे.पौराणिक काळ जागा करणा-या या चित्रपटाचे बरेचसे चित्रण झाले असून काही चित्रण बाकी आहे. अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात अत्यंत महत्वाची भूमिका आहे. अमिताभ बच्चन यांनी मात्र त्यांच्या वाट्याच्या सर्व दृश्यांचे मार्चमध्येच शूटिंग पूर्ण केलेले आहे. त्यांचे फक्त डबिंगचे काम बाकी आहे. मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग होऊ न शकल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढील वर्षात ढकलण्यात आले आहे. पाच भाषात तयार होणा-या या चित्रपटात नागार्जुनचीही महत्वाची भूमिका आहे. याचित्रपटाचे दोन भाग तयार करण्याची योजना करण जोहरने आखलेली आहे.

Amitabh Bachchan

चेहरे- इमरान हाशमी आणि अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी असलेला हा चित्रपट खूप चर्चेत आहे. रूमी जाफरी यांचे दिग्दर्शन असलेला हा एक रहस्यमय चित्रपट आहे. खरे तर जुलैमध्येच चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना होती. परंतु लॉकडाऊनमुळे शूटिंग होऊ शकले नाही. आता पुढील वर्षी चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना असून त्यानुसार काम सुरु आहे.

आंखें २ – आंखे या सुपरहिट चित्रपटाचा पुढील भाग आंखे २ ची तयारी सुरु करण्यात आली असून अनिस बाज्मी दिग्दर्शित या चित्रपटात पुन्हा एकदा अमिताभ एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आंखेमध्ये अमिताभ बच्चन चार आंधळ्यांकडून बँक कशी लुटतो त्याची कथा दाखवण्यात आली होती. अक्षय कुमार, परेश रावल, अर्जुन रामपाल आणि सुष्मिता सेन यांनीखूप चांगल्या प्रकारे भूमिका साकारल्या होत्या. आता आंखे-२ मध्ये अमिताभ काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बुद्धं शरणं गच्छामी- विवेक शर्मा द्वारा दिग्दर्शित बुद्धं शरणं गच्छामीमध्ये गँगस्टर आणि बुद्धांचा शांतीचा संदेश यांचा अनोखा संगम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अमिताभ बच्चन यात मुख्य भूमिका साकारीत आहेत. सरकारमधील भूमिकेसारखी ही भूमिका आहे असे म्हटले जात आहे. हा एक अॅक्शनपॅक्ड चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरु केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

याशिवाय अभिषेक बच्चनसोबत टाईम मशीन आणि आर. बल्कीसोबत एक चित्रपट करण्यास अमिताभ बच्चन यांनी होकार दिल्याची माहिती आहे. अभिषेकबरोबरचा चित्रपट सायफाय असून आर. बल्किसोबतचा चित्रपट पुन्हा एकदा एका नव्या समस्येवर आधारित आहे.आर. बल्कीबरोबर अमिताभने शमिताभ, पा. चिनी कम असे चित्रपट केलेले आहेत.

तसेच झुंड हा मराठीतील प्रख्यात लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळेचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट पूर्ण झाला असून या चित्रपटात अमिताभ बच्चन एका क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गावातील मुलांची फुटबॉलची टीम तयार करून ते त्या मुलांना कसे यश मिळवून देतात त्याचे चित्रण यात करण्यात आलेले आहे. हा चित्रपट पूर्ण झालेला असून गुलाबो सिताबोप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER