चव्हाणांना राग येत असला तरी मराठा आरक्षणासाठी गप्प बसणार नाही – चंद्रकांत पाटील

ashok chavan - Chandrakant Patil - Maharashtra Today

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना डिवचले. मराठा आरक्षणाबाबत सत्य परिस्थिती सांगितल्याने चव्हाणांना राग येत असतो. मात्र त्यांना राग येतो म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शांत बसणार नाही. तसेच कोरोनाचे कारण दाखवून मराठा समाजातील तरुण-तरुणींना संताप व्यक्त करण्यापासून रोखताही येणार नाही, असा खरमरीत टोला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांशी संवाद साधताना टीकेचे बाण सोडले. या सरकारला मराठा आरक्षण द्यायची इच्छा नव्हती, हे सामान्यांच्या मनात बिंबलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात एक परिच्छेद आहे की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या मराठी मजकुराचा इंग्रजी अनुवाद मिळाला नाही. निर्णयाच्या एका परिच्छेदात असेही म्हटले आहे की, मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार नव्हते; परंतु स्थगिती न देता खटला चालवू म्हटल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्येक वेळा तारीख मागितली गेली. अखेर नाइलाजाने न्यायालयाला स्थगिती द्यावी लागली. सामान्यतः कायद्याला स्थगिती मिळत नाही. पण राज्य सरकारकडून चालढकल चालू आहे, हे कोर्टाच्याही ध्यानात आले. मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारने दुर्लक्ष केले.

त्यांना हे आरक्षण द्यायचे नव्हते. तर त्याबद्दल बोलायचे नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. मराठा समाजाच्या तरुण-तरुणींच्या मनात अनिश्चिततेमुळे निर्माण झालेला संताप व्यक्त करण्यापासून कोरोनाचे संकट असले तरी आता ते थांबवता येणार नाही. कोरोनाचे नियम पाळून आणि संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना आंदोलन करू द्यावे लागेल. एकीकडे सत्ताधारी आमदारांना गावांमध्ये रस्ते करण्यासाठी निधी देता, तुमचे सर्व राजकारण चालू ठेवता आणि दुसरीकडे मराठा तरुण-तरुणींना रस्त्यावर उतरू नका म्हणता. पण ते ऐकणार नाहीत.

मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या, अशी मागणी मी कालच केली आहे. असे पॅकेज देण्याबाबत न्यायालयाने सरकारची अडवणूक केलेली नाही. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे समाजाचे होणारे नुकसान भरून देऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. मग आता ते भरून द्या, एवढीच आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस सरकार असताना मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करताना कायदा होईपर्यंत आम्ही मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी सवलती दिल्या होत्या. तशा सवलती द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button