शरद पवारही मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, ते फडणवीसांनी दिले होते, आघाडीला तेही टिकविता आले नाही : संजय काकडे

Sanjay Kakade-Devendra Fadnavis-Sharad Pawar

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) राज्य सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणासंदर्भातला (maratha-reservation) कायदा रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच राज्यात मराठा आरक्षणाचा रद्द झालेला कायदा आणि पुढची पावलं या मुद्द्यांवरून राज्यात सत्ताधारी महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांनीही याबाबत भाष्य केले.

मराठा आरक्षणाची मागणी १९८५ पासून केली जात आहे. तेव्हापासून आजवर झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखविली नाही. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि ५० वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले शरद पवारही (Sharad Pawar) मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देण्याची हिम्मत दाखविली. ते सुद्धा या सरकाराला टिकविता आले नाही. त्यामुळे आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमके काय करणार आहात असा सवाल काकडे यांनी उपस्थित केला .

शरद पवार यांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले. मराठा नेते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून ते उदयास आले. मराठ्यांसाठी काहीतरी करतील अशी समाजाला आशा होती. पण त्यांनाही आरक्षण देता आले नाही. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात राष्ट्रवादी आहे कुठे असा प्रश्न काकडे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button