आझाद हिंद सेनेची स्थापना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांनाही आर्मीत प्रवेश नव्हता मिळाला..! 

Netaji subhash chandra bose

स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी  असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस (Even Netaji Subhash Chandra Bose, the founder of Azad Hind Sena, did not get admission in the Army ..!)यांची जयंती दरवर्षी पराक्रम दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.  येत्या २३ जानेवारीला सुभाष बाबूंची १२५वी जयंती आहे. हे  औचित्य साधून  पंतप्रधान मोदींनी हा निर्णय घेतलाय.

भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीकारी फौज उभारणारे सुभाषचंद्र बोस. त्यांनी “तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुंगा” अशी घोषणा दिली आणि तरुणाईचा जनसागर त्यांच्या पाठी उभा राहिला. २३ जानेवारी १८९७ला ओडीसाच्या कटक शहरातील प्रसिद्ध वकिल जानकिनाथ बोस आणि प्रभावती देवींच्या पोटी त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य संग्रामातील सर्वश्रेष्ठ नेत्यांपैकी ते एक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौजेच गठण केलं. २१ ऑक्टोबर १९४३ जपानच्या मदतीनं आझाद हिंद सेना बनवली. त्याचे ते सेनापती होते. त्यांनी बनवलेल्या अस्थायी सरकारला जपान, फिलीपींस, कोरिया, चीन, इटली, मान्चुको  आणि आयरलँडसहित ११ देशांनी मान्यता दिली होती.

डोळ्यांमुळं नाकारण्यात आला सैन्य प्रवेश

कटकमध्ये प्राथमिक शिक्षक घेतल्यानंतर रेवेनशा कॉलेजियेट शाळेत सुभाषचंद्र बोसांनी प्रवेश घेतला. त्या शाळेचे मुख्याधापक बनीमाधव दास बोस यांच्या प्रतिभेने प्रभावित झाले होते.  त्यांनी वयाच्या १५व्या वर्षीच विवेकानंदांच्या संपूर्ण साहित्य वाचलं होतं. ४० बंगाल रेजिमेंट भरती होण्यासाठी त्यांनी परीक्षा दिली. परंतू डोळ्यातील खराबीमुळं त्यांची सैन्यदलात निवड होवू शकले नाही. कधीकाळी ब्रिटीश सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करणारे सुभाष बाबू नंतरच्या काळात ब्रिटीश सैन्याला सळो की पळो करून सोडतील असा विचार कुणीच केला नसेल. १९१९मध्ये सुभाष बाबूंनी बीएची पदवी मिळवली.  १९२०ला त्यांनी आयएएस परीक्षा पास केली. एका वर्षाच्या नोकरीनंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांना इंग्रजांची चाकरी करायची नव्हती.

एमिली शेंकलशी केला प्रेमविवाह

वर्ष १९३४ सुभाष बाबू ऑस्ट्रियात उपचार घेत होते. तेव्हा त्यांना त्यांचं पुस्तक लिहण्यासाठी एका इंग्रजी टायपीस्टची गरज होती. सुभाष बाबूंच्या मित्राने त्यांची भेट एमिली शेंकल नावाच्या मुलीशी करवून दिली.  यानंतर दोघे प्रेमता पडले. दोघांनी हिंदू रित रिवाजाप्रमाणं लग्न केलं.

हिटलरशी भेट

सुभाष बाबूंनी जर्मनीत भारतीय स्वातंत्रता संघटन आणि आझाद हिंद रेडिओची स्थापना केली. यादरम्यान सुभाष बाबूंची जर्मनी सरकारातील मंत्री एडम फॉन ट्रॉट यांच्याशी मैत्री झआली. २९ मे १९४२ला सुभाष बाबू हिटलरला भेटले. ब्रिटीशांना आणि अमेरिकेला पुरुन उरलेल्या हिटलरने भारतीय स्वातंत्र युद्धात आपली मदत केली तर देश लवकर स्वतंत्र होईल, अशी सुभाष बाबूंची धारणा होती.

परंतू हिटलरला भारतात कोणताच रस नव्हता. त्याने सुभाष बाबूंच्या प्रस्तावाला न होकार दिला न नकार. त्यानंतर स्वबळावर लढण्याचा सुभाष बाबूंनी निर्णय घेतला. आझाद हिंद सेनेची मुहुर्तमेढ रोवली गेली. २१ ऑक्टोबर १९४३ला.  त्यांनी स्थापन केलेल्या सरकारात ते प्रधानमंत्री, युद्ध मंत्री आणि राष्ट्रपती होते. जगभरातल्या ९ देशांनी सुभाष बाबूंच्या प्रति सरकारास मान्यता दिली होती.

आजतागायत न सुटलेलं त्यांच्या मृत्यूच कोडं

सुभाष बाबूंचा मृत्यू आजही एक रहस्य आहे. एक कोडं जे सोडवण्यचे फक्त प्रयत्न झाले कुणाच्याच हाती काही ठोस लागलं नाही. दिनांक १८ ऑगस्ट १९५४. बोस यांच्या विमानानं मंचुरियाच्या दिशेनं झेप घेतली तिथंवर पोहचू शकलं नाही. २३ ऑगस्टला टोकियोच्या रेडीओवरुन सांगण्यात आलं सुभाष बाबू कालवश झालेत.  ताइहोकू विमानतळाजवळ त्यांचं विमान दुर्घटना अवस्थेत सापडलं.  सप्टेंबरमध्ये त्यांची अस्थी रँकोजी मंदिरात ठेवण्यात आल्या. भारत सरकारने या घटनेच्या तापासासाठी आयोगाची स्थापना केली. १९७७ला पुन्हा आयोग नेमण्यात आला.  १९९९ला मनोज कुमार मुखर्जींच्या नेतृत्त्वात तिसरा आयोग बनला. २००५मध्ये तैवान सरकारनं स्पष्ट केलं१९४५ला विमान दुर्घटना झाली नव्हती. सुभाष बाबूंच्या मृत्यूप्रकरणी गुढ काहीच हाती लागलं नाही. काही जण दावा करतात की सुभाष बाबू बरीच वर्ष भूमिगत होते. जिवंत होते.

 Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER