
यंदाची आयपीएल (IPL) अतिशय चुरशीची होतेय. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हा एकच संघ वगळला तर अजुनही उर्वरीत सात संघ प्ले आॕफच्या स्पर्धेत आहेत. शेवटच्या काही सामन्यांमध्ये गुणतालिकेतील खालच्या क्रमांकाच्या संघांनी त्यांच्यापेक्षा वरच्या क्रमांकाच्या संघांना मात दिली आहे. त्यामुळे चेन्नई वगळता अजुनही या स्पर्धेत इतर संघांना पुरेपूर संधी आहे.
रविवारी सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्सला (RCB) आणि राजस्थान रॉयल्सने (RR) मुंबई इंडियन्सला (MI) पराभवाचा धक्का दिला. त्याच्याआधी कोलकाताने दिल्लीला चकित केले तर किंग्ज इलेव्हनने नंतरचे चार सामने जिंकत जबरदस्त मुसंडी मारली आहे. त्यामुळे सर्वांचे आता फक्त तीन तीन सामनेच बाकी असले तरी चुरस कायम आहे. 45 सामन्यानंतर अशी चुरस कायम आसलेली इतिहासातील बहुधा ही पहिलीच आयपीएल असावी.
स्पर्धेत कोणताच संघ अभेद्य किंवा अपराजेय दिसत नाही.प्रत्येक बलाढ्य संघाला कुणी ना कुणी मात दिली आहे. किमान चार पराभव प्रत्येकाच्या नावावर आहेत.
मुंबईला राजस्थान सारख्या संघाने रविवारी खडे चारले तर किंग्ज इलेव्हनने दिल्ली अजिबात दूर नसल्याचे सिध्द करुन दाखवले. मात्र चेन्नई व हैदराबादच्या अपयशाने दक्षिणेकडील संघ मागे पडले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला