आमच्यात वैचारिक मतभेद असले तरीही तोपर्यंत शिवसेनेसोबत राहणार – सचिन सावंत

Sachin Sawant - CM Uddhav Thackeray

पुणे : राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेस (Congress) यांच्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविषयी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मोठं विधान केलं आहे.शिवसेना आणि आम्ही आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, असं वाटत असेल तर साहजिक आहे. सर्वजण आपली ताकद वाढवावी यासाठी प्रयत्न करणार त्यामध्ये काही गैर नाही,असं सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले. भाजपचे (BJP) लोकशाहीवर जे गंडांतर आलेलं आहे, ते दूर होत नाही पर्यंत आम्ही एकत्रितपणे राहणार आहोत. तीन पक्ष मिळून एकत्रितपणे सरकार चालवू त्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केलाय, त्यावर पूर्ण पाच वर्षे हे सरकार चालेल, असा विश्वास काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोठं विधान केलं.

पुणे येथील काँग्रेस भवन मध्ये सचिन सावंत बोलत होते. यावेळी सचिन सावंत म्हणाले, शिवसेना आणि आम्ही आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलो आहोत. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, यात शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा, असं वाटत असेल तर साहजिक आहे. सर्वजण आपली ताकद वाढावी, यासाठी प्रयत्न करणार, त्यामध्ये काही गैर नाही. भाजपाचे लोकशाहीवर जे गंडांतर आलेलं आहे, ते दूर होत नाही तोपर्यंत आम्ही एकत्रितपणे राहणार आहोत. तीन पक्ष मिळून एकत्रितपणे सरकार चालवू. त्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केलायय त्यावर पूर्ण पाच वर्षे हे सरकार चालेल, असं सचिन सावंत म्हणाले.

पुढे बोलताना सावंत म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत मोदी सरकार अनुकूल नाही. त्यामुळे भाजपचे राज्यातील नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक महाविकास आघाडीबाबत अपप्रचार केला जात आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. भाजपच्या नेत्यांनी मराठा आरक्षणावरुन आग लावण्याचे, लोकांना फितवण्याचे धंदे बंद करावेत, ही विनंती करतो. मराठा आरक्षणाच्या विषयावर जी न्यायालयीन लढाई सुरु आहे, त्यावर राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीकडून हा लढा लढला जातोय, याची पोटदुखी भाजपला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER