सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही ; उद्धव ठाकरेंचे मोदींच्या भेटीनंतर वक्तव्य

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई : पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या वैयक्तिक भेटीची माहिती दिली.

पंतप्रधानांना आपण स्वतः भेटलो, त्यांना एकटे भेटलो असे उद्धव ठाकरे म्हणाले. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. याआधी बराच काळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे पंतप्रधनांसोबत आमची व्यक्तिगत भेट झाली. या भेटीत वावगं काहीच नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान शिष्टमंडळासोबतच्या अधिकृत भेटी दरम्यानच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वैयक्तिक भेट होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याविषयी सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली., असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास तीस मिनिटं भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button