‘मंत्रिपद गेले तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; वडेट्टीवार यांची ग्वाही

- वातावरण तापले

Vijay Vadettiwar

औरंगाबाद :- मराठा आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. नेते प्रक्षोभक विधान करत आहेत. यावरून ओबीसी कार्यकर्ता परिषदेत काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी कार्यकर्त्यांना ग्वाही दिली, मंत्रिपद गेलं तरी चालेल मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी नेते बैठका घेत आहेत. औरंगाबादमध्ये (Aurangabad) घेण्यात आलेल्या परिषदेत ओबीसींचे आरक्षण सुरक्षित राहील, याची ग्वाही देताना विजय वडेट्टीवार म्हणालेत, ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सर्व नेत्यांचे आश्वासन आहे, मंत्रिपद गेले तरी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.’

परिषदेत गोंधळ

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या समोरच मराठवाडा ओबीसी कार्यकर्ता परिषदेत मंचावर गोंधळ झाला. बालाजी शिंदे यांनी छगन भुजबळ यांनी पाप केले, असे वक्तव्य केल्याचा आरोप करीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि गोंधळ सुरू झाला. वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.

मग ओबीसी गप्प बसतील का? छगन भुजबळांचंही आक्रमक विधान

नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘समता परिषद मराठा आरक्षणाविरोधात नाही. मात्र, ओबीसींना धक्का लागत असेल तर ओबीसी गप्प बसणार नाही. तुम्ही धमक्या देतात लाठी काठी तलवारीच्या… मग ओबीसी गप्प बसतील? शरद पवार कुठून आरक्षण देणार? मोर्चा काढून काय उपयोग? शरद पवार यांनी मराठा समाजाला कधीच आरक्षण नाकारले नाही, असे भुजबळ म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER