लोकप्रियता कमी झाली तरी पुन्हा मोदीच येणार सत्तेत; मेहुल चोक्सीचा दावा

Maharashtar Today

सूरत : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषध आणि ऑक्सजिन तुटवडा, रुग्णांना बेड्स न मिळणे यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्यांकडून केला जात आहे. त्यामुळे या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान मोदींची(PM Modi) लोकप्रियता कमी झाल्याचे दिसते मात्र मोदींवर पीएचडी करणाऱ्या गुजरातमधील मेहुल चोक्सी (Mehul Choksi) या याने म्हटले आहे की, “सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदींची लोकप्रियता कमी झाली असली तरी आजही अनेकांच्या हृदयामध्ये मोदींना अढळ स्थान आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा मोदीच सत्तेत येतील.

सूरतनिवासी मेहुल चोक्सीने पंतप्रधान मोदींवर “लीडरशीप अंडर गव्हर्मेंट- केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी”,(Leadership Under Government- Case Study of Narendra Modi) हा विषय घेऊन संशोधन केले आहे. या संसधोनात त्यांनी साडेचारशे लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यात सरकारी कर्मचारी, अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांचा समावेश होता. मेहुल यांनी मोदींच्या नेतृत्वाबाबत काही समान प्रश्न या मुलाखतींमध्ये विचारले होते. मोदींची भाषण जनतेला खूप आकर्षक वाटतात असे यात मेहुलला आढळले.

४८ टक्के लोकांनी मोदी राजकीय मार्केटींगमध्ये उत्तम असल्याचे मत व्यक्त केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाची जगभरामध्ये चर्चा झाली. दुसऱ्या लाटेच्या व्यवस्थापनामध्ये मात्र नक्कीच काही उणीवा राहिल्यात. त्यामुळे लोकांनी संताप उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर आणि सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केला. असे असले तरी मोदींच्या प्रतिमेवर याचा काहीही परिणाम झालेला नाही, असा दावा मेहुल यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केला. लोकांचा आजही मोदींवर विश्वास आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी निवडणुकांमध्ये फार फरक पडणार नाही, असे मेहुलने म्हटले आहे.

मेहुलने २०१० मध्ये ‘थीसिस’ लिहीले होते. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मेहुल यांनी आपल्या संशोधनामध्ये मोदींशी संबंधित प्रश्न विचारले होते. यावेळी ५१ टक्के लोकांनी सकारात्मक तर ३४.२५ टक्के लोकांनी नकारात्मक मत दिले होते.

कोरोना कालावधीमध्ये प्रशासनाच्या अपयशामुळे पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही, असे विश्लेषण मेहुल चोक्सी यांनी केले आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार पुन्हा मोदींच्या पारड्यात मत टाकतील असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button