मुंबईत एका दिवसात १० हजार रुग्ण वाढले तरी व्यवस्था करू – इक्बाल चहल

मुंबई :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांमधील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीतही कोरोना (Corona) नियंत्रणात असल्याचा दावा मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) आयुक्त इक्बाल चहल यांनी केला आहे. मुंबईकरांना घाबरण्याची गरज नाही. मात्र, काळजी घेण्याचे आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळण्याचे आवाहनही चहल यांनी केली आहे.

२४ मार्चला १० रूग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत एका दिवसात १० हजार पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास उपचाराची व्यवस्था आहे. तसेच १० लाख जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पण दिवसाला १ लाख लोकांचे लसीकरण करण्याचा मानस असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती

बुधवारी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक होता. काल दिवसभरात ५ हजार १८५ नवे रुग्ण आढळले. तर २ हजार ८३ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यात ६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील काहीजणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३ पुरुष आणि ३ महिला रुग्णांचा समावेश आहे. रुग्णसंख्या दुपटीचा दर ८४ दिवसांवर आला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी स्वतंत्र संस्था

राज्य सरकार आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलणार आहे. या संदर्भात बुधवारी(काल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्विट माध्यमातून दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER