
मुंबई : विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार मुसंडी मारत ५ जागा जिंकल्या. नुकत्याच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी ट्विट करून महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केले – महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबत उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे, हे या निकालाने सिद्ध होते.
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाकरता महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि सतीश चव्हाण, जयंत आसगांवकर, अभिजीत वनजरी यांना हार्दिक शुभेच्छा, असे दुसरे ट्विट मातोंडकर यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबत उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हे या निकालाने सिद्ध होते.@ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra #अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 4, 2020
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाकरता महाविकास आघाडीचे @NCPArunLad @satishchavan55 @AsgaonkarJayant @wanjarii यांचे अभिनंदन 👍🏻👍🏻 पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 4, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला