‘रुही’ रिलीज होण्यापूर्वीच राजकुमार रावच्या नव्या सिनेमाला सुरुवात

निर्माता दिनेश व्हिजन यांनी राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) अभिनीत ‘स्त्री’मधून हॉरर कॉमेडी जॉनर सादर केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला होता. त्यानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरला (Jahnvi Kapoor) घेऊन दिनेश व्हिजनने रुही सिनेमाला सुरुवात केली होती. हा सिनेमासुद्धा हॉरर कॉमेडी जॉनरचा असून यात जान्हवी कपूर भूताच्या रुपात दिसणार आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. मात्र हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच निर्माता दिनेश व्हिजनने राजकुमार रावसोबत आणखी एक सिनेमा सुरु केला आहे.

राजकुमार रावने लॉकडाऊन असतानाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘छलांग’, ‘लूडो’ आणि ‘द व्हाईट टायगर’ सिनेमे दिले. त्याचे हे तिन्ही सिनेमे प्रेक्षकांचा खूपच आवडले आहेत. आता तर मोठ्या पडद्यावर त्याचा रुही रिलीज होणार आहे. आणि आता तर त्याला आणखी एक नवा सिनेमा मिळाला आहे. या नव्या सिनेमात राजकुमार राव पुन्हा एकदा ‘स्त्री’मधील त्याचा पार्टनर अपारशक्ती खुराणासोबत दिसणार आहे. दिनेश व्हिजन सध्या जम्मू कश्मीरमध्ये असून माता वैष्णो देवीची यात्रा करीत आहे. या नव्या सिनेमाची घोषणा त्याने जम्मूमध्येच केली. दिनेश व्हिजनसोबत निर्माता महावीर जैनही या सिनेमाची निर्मिती करणार आहे. या सिनेमात नायिकेची भूमिका करण्यासाठी कृती सेननला (Kriti sanon) साईन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कृती सेनन दिनेश व्हिजनची अत्यंत आवडती नायिका असल्याने तिची निवड केल्याचे सांगितले जात आहे. राजकुमार राव आणि कृती सेननने यापूर्वी ‘बरेली की बर्फी’ सिनेमात एकत्र काम केले आहे. सिनेमात या दोघांसोबत परेश रावल आणि रत्ना पाठक शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही.

राजकुमार राव आणि कृता सेनन अभिनीत या सिनेमातून गुजराती सिने इंडस्ट्रीतील एक प्रख्यात दिग्दर्शक अभिषेक जैन हिंदीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवत आहे. हा सिनेमासुद्धा राजकुमार रावला त्याच्या अगोदरच्या सिनेमाप्रमाणे यश नक्कीच मिळवून देईल असे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER