पवारांनी रुग्णालयातही जाणून घेतली कोरोनाची परिस्थिती; रोहित पवारांनी शेअर केला किस्सा

Rohit Pawar And Sharad Pawar

मुंबई : अचानक पोटात दुखू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ते सध्या रुग्णालयातच असून उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर लवकरच आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबतचा रुग्णालयातील एक प्रसंग शेअर केला आहे.

‘शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांसह आम्ही पवारसाहेबांची भेट घेतली. टोपेसाहेबांना पाहून पवारसाहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो.’

अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे. शरद पवार हे नेहमी आपल्या कामाला प्राधान्य देतात. या वयातही ते दौरा करून राज्यातील कानाकोपऱ्यातील लोकांना भेटतात आणि त्यांचे प्रश्न समजून घेतात. रुग्णालयात असतानाही त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय दिसून आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button