निवडणुकीनंतरही भालके-आवताडेंनी जपले कार्यकर्त्यांशी भावनिक नाते

Maharashtra Today

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर मतदारसंघातील गावागावात आता कार्यकर्ते कोण बाजी मारणार यावर चर्चा करताना दिसून येत आहे. निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी प्रचारादरम्यान एकमेकांविरोधात तोंडसुख घेतले. मात्र भगीरथ भालके आणि समाधान आवताडे हे दोघेही रविवारी (ता. १८ एप्रिल) मतदारसंघातील मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी घराबाहेर पडले होते.

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना प्रचारासाठी आणत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यावा, यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनीदेखील गेल्या महिनाभरापासून मतदान होईपर्यंत दिवसरात्र एक केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे हे मतदारसंघातील पाटकळ येथील निधन झालेले कार्यकर्ते चव्हाण कुटुंबीयांना भेटण्यासाठी व्यस्त होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हेदेखील नुकतेच बोराळे येथील निधन झालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब पाटील यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बोराळे ते आले होते. गावोगावच्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून विजयाच्या पैजा लावल्या जात आहेत. या सर्व चर्चांमध्ये उमेदवारांनी मात्र निधन झालेले कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ दिला. मतदानानंतर सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आजतागायत मतदारसंघात होते. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी या गोष्टीला छेद दिल्याचे चर्चा मतदारसंघात सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button