मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतरही संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम

Sambhaji Raje Chhatrapati - CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षा काही महिने पुढे ढकलाव्या, या भूमिकेवर भाजपचे (BJP) खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) ठाम आहेत. राज्य सरकार जोपर्यंत एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. सरकारनं आमची बाजू ऐकून घेतली, सरकार देखील सकारात्मक असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) आम्ही समाजाची भावना सांगितल्या असून समाज कसा व्यथित आहे हे सविस्तरपणे सांगितले.

खासदार संभाजी राजे यांनी सांगितलं की, एमपीएससीची गडबड का चालली आहे. जुन्या परीक्षा झाल्या. त्यांची नियुक्ती का होत नाही आहे. ४२० नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यापैकी १२७ नियुक्त्या या मराठा समाजाच्या आहेत. आमचं म्हणणं सरकारला पटलं आहे. सरकार परीक्षा पुढे ढकलण्यास अनुकूल असून लवकरच सकारात्मक निर्णय देईल, असा विश्वास संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

१०२व्या घटनादुरुस्तीला मी पाठिंबा दिला होता. १९६७ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Community Reservation) मिळत होते. राज्य मागासवर्गीय आयोगाला 288 आमदारांनी मंजुरी दिली. ज्या आमदारांनी हे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला ते आमदार चुकीचे आहेत का?, असा सवाल संभांजीराजेंनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे संबंध होते. प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवर वक्तव्य करणे, मला पसंत पडले नाही, त्यांनी तसे वक्तव्य करायला नको होते. माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे.

दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी विनायक मेटेंच्या (Vinayak Mete) अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. तब्बल दीड ते दोन तास सुरू असलेल्या या बैठकीतनंतर शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी माध्यमांशी संवाद साधला.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसोबत २० मुद्द्यावर चर्चा झाली. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे विनायक मेटेंनी सांगितले. एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय घ्यावा लागेल, त्यामुळे पुन्हा बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात येईल, असं चित्र आहे. मात्र जर परीक्षा झाल्याच तर मराठा समाजासाठी मोठा आघात असेल. त्यामुळे ही परीक्षा रविवारच्या ऐवजी पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज रात्री उशिरा पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नेमकी बाब स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. आता एमपीएससीच्या परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे लवकरच समोर येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER