पतिच्या मृत्यूनंतरही वयाच्या ३५ व्या वर्षी मिळवलं सैन्याधिकारी पद !

Women Army officer - Maharastra Today
Women Army officer - Maharastra Today

एखाद्या युद्धात पुरुष सैन्यअधिकारी शहिद झाल्याच्या बातम्या आपण नेहमी पाहतो; पण एखादी महिला सैन्यअधिकारी लढत लढत मातृभूमिसाठी बलिदान देते अशी बातमी आपल्याला क्वचित पहायला मिळते. महिला सैन्य अधिकाऱ्यांनीसुद्धा देशहितासाठी प्राणांची बाजी लावून देशाचं रक्षण केलंय. भारतीय सैन्यात अनेक महिला सैन्य अधिकारी आहेत. पण महिलांसाठी सैन्य क्षेत्र नाही हा समज सुरुवातीला काही महिलांना खोडून काढावा लागाला. त्यापैकीच एक होत्या ‘शांती तिग्गा.’ भारतीय सैन्यात भर्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी तारुण्य नाही; देशसेवाचं व्रत स्वीकारलं. त्यांचा प्रवास भलेही संक्षिप्त असेल पण प्रेरणेनं भरलेला आहे. त्यांच आयुष्य अनंतकालासाठी ‘अमर ज्योती’ तेवत ठेवण्यासाठी उपयोगाच आहे.

पतिच्या मृत्यूनंतर जिद्द सोडली नाही

शांती यांचा जन्म पश्चिम बंगालच्या ‘जलपाईगुडी’ जिल्ह्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थीती हालाखीची होती. अनेक आर्थिक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या समाजात मुलींच लग्न कमी वयात लावून दिलं जायचं. त्यांचही लग्न कमी वयात झालं. वयाच्या वीसाव्या वर्षी त्या दोन मुलांच्या आई झाल्या होत्या. त्यांच आयुष्य संघर्षातून वाट काढत सुरु होतं. त्यांचे पती रेल्वेत होते. त्यांच्याच कमाईवर घर खर्च चालायचा. सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा होती.

शांती ३० वर्षाच्या होत्या जेव्हा त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. वर्ष होतं २००५. मुलांच्या डोक्यावरुन पित्याचं छत्र हरपलं. दुःखाला घोटून शांती यांना स्वतःच्या मुलांसाठी जगायचं होतं. पतिला सरकारी नोकरी असल्यामुळं शांती पतीच्या जागी रुजु झाल्या. त्यांची पहिली पोस्टींग झाली होती जुलपाईगुडी जिल्ह्याच्या ‘चालसा’ स्टेशनवर. त्यांना घर चालवण्याची चिंता होती. पतिच्या मृत्यू आधी त्यांनी ‘टेरिटोरियल आर्मी’बद्दल ऐकलं होतं. त्यांचे काही नातेवाईक या सैन्यदलात काम करत होते. दोन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी कधी विचार ही केला नव्हता की त्यांना ही संधी मिळेल.

३५ व्या वर्षी केलं स्वप्न पुर्ण

नोकरीवर रुजु झाल्यानंतर त्यांचा आत्मनिर्भर होण्याचा प्रवास सुरु झाला. त्यांना आता टेरिटोरियल आर्मीत भर्ती व्हायचं होतं. २०११ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अर्ज भरला. त्यांना अर्ज भरताना कळलं की कोणतीच महिला अधिकारी याआधी भर्ती झालेली नाही. शांती यांनी पाऊल मागं घेतलं नाही. पुर्ण ताकदीनं शारिरिक आणि लेखी चाचणीची त्यांनी तयारी केली. सर्व पुरुषांमध्ये त्या एकटा महिला होत्या ज्या भर्तीसाठी प्रयत्न करत होत्या.

१.५ किलोमीटरच्या शर्यतीत त्यांनी सर्व पुरुषांना मागे टकालं. वेळेच्या ५ सेकंदा आधी त्यांनी अंतर पुर्ण केलं. ५० मीटरची शर्यत त्यांनी फक्त १२ सेकंदांमध्ये पुर्ण केली होती. सर्व परिक्षा पास करत त्यांना ‘९६९ रेल्वे इंजिनिअर’ रेजिमेंटमध्ये तैनाती मिळाली.

बदनामीचा डाग आणि नंतर

शांती यांचं आयुष्य मात्र अशांतच होतं. त्यांनी अनेक वादळांना तोंड दिलं. शांती सैन्यात भर्ती झाल्या. स्वप्न पुर्ण झालेल्याबद्दल त्या खुश होत्या पण लवकरच त्यांच आयुष्य कलाटणी घेणार होतं. नोकरीच्या दिड वर्षाच्या आतच त्यांच्यावर आरोप लावण्यात आले की शांती पैसे घेऊन सैन्यदलात युवकांना भर्ती करतात. शांती यांच्या हिंमत आणि बहादूरीचे किस्से जे लोक एकमेकांना सांगायचे त्यांनीच नंतर आपसात शांती भ्रष्ट असल्याच्या वावड्या उठवायला सुरुवात केली. आरोपांच्या कल्लोळातच त्यांच्यावर हल्ले व्हायला सुरुवात झाली.

९ मे २०१३ला त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांच्या अपहरणाची खबर सैन्य तुकडीला मिळताच शोधाशोध सुरु झाली. रात्रभर शोध घेतल्यानंतर सुद्धा शांती यांचा सुगावा लागायला काही मार्ग नव्हता. पुढच्याच दिवशी शांती सैनिकांना दिसल्या. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधूंन त्यांना रेल्वेच्या खांबाला बांधण्यात आलं होतं. त्यांना मारहाण वगैरे झाली नव्हती. त्यांना दवाखन्यात भर्ती करण्यात आलं. या घटनेमुळं त्यांच्यावर मोठा आघात झाला होता.

या नंतर काही दिवसातच शांती यांच्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी फास घेतला असं दिसत होतं. पोलिसांनी दबावात येऊन ती आत्महत्या असल्याचा रिपोर्ट लिहून घेतला. शांती यांच्या नातेवाईकांच म्हणनं होतं की ही हत्या आहे. याबद्दलच सत्य कधी बाहेर आलंच नाही. शांती तग्ग एक धडाकेबाज महिला होत्या. मोठ्या प्रतिकुल परिस्थीतीवर त्यांनी विजय मिळवत सैन्यअधिकारी बनवण्याच स्वप्न साकार केलं होतं. त्यांच्याकडे बघून अनेक महिला नंतरच्या काळात सैन्यात भर्ती झाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button