‘छत्रपतींच्या नावाने सत्तेत आले तरी, मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकू येत नाही’

Chandrakant Patil-Thackeray Govt

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्येनंतर (Deepali Chavan’s suicide) आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली, त्या घटनास्थळी सुसाईड नोटआढळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर निशाणा साधला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही’, असं संतापजनक विधान पाटील यांनी केलं.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरुन महाविकासआघाडी सरकारचा समाचार घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही’. राज्यात दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याला कोण जबाबदार आहे? महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदनाहीन असलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. या सरकारचे भीषण स्वरूप भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवले पाहिजे, असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था तर ‘न घर का न घाट का’, असं म्हणत टोला लगावला.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. पण हे सरकार बेभान होऊन केवळ आपले गुन्हे आणि भ्रष्टाचार लपविण्यामागे व्यस्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जरा डोळे उघडून कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या बघा म्हणजे तुम्हाला राज्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाची जाणीव होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण ; उप वन संरक्षक विनोद शिवकुमारला अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER