कोरोना लस घेतल्यानंतरही परेश रावल यांना झाली कोरोनाची लागण

Maharashtra Today

कोरोनाची दुसरी लाट बॉलिवूडकरांसाठी खूपच त्रासदायक ठरताना दिसत आहे. पहिल्या लाटेत काही मोजक्याच मोठ्या कलाकारांना आणि जास्तीत जास्त छोट्या पडद्यावरील कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी मात्र आमिर खानपासून (Aamir Khan) मनोज वाजपेयी, (Manoj Bajpai) कार्तिक आर्यन, (Kartik Aryan) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आर. माधवनपर्यंत (R. Madhvan) अनेक मोठ्या कलाकार आणि निर्मात्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या यादीत आता प्रख्यात अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांचाही समावेश झाला आहे. परेश रावल यांनी स्वतःच सोशल मीडियावर त्यांना कोरोनाची लागण ( Paresh Rawal became infected with corona) झाल्याची माहिती दिली आहे.

६५ वर्षीय परेश रावल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘दुर्देवाने माझी कोविड-१९ ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या १० दिवसात माझ्या संपर्कात जे जे आले होते त्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करून घ्यावी ही विनंती. परेश रावल यांनी ही पोस्ट टाकताच ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करणाऱ्यांच्या पोस्टचा पाऊस परेश रावल यांच्यावर पडला आहे. विशेष म्हणजे ९ मार्च रोजीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. लस घेतल्यानंतर त्यांनी लस घेतानाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. असे असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूड, त्यांचे कुटुंबिय आणि त्यांच्या फॅन्सनाही प्रचंड आश्चर्य वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER