अमेरिकेत ज्योतिषविद्येला विज्ञानाचा दर्जा मिळवून देणारी ‘एवांगेलिन’!

Evangeline Adams - Maharashtra Today

आजच्या विज्ञान युगात तर्कात न बसणाऱ्या गोष्टीला थेट रद्दपात्र ठरवलं जातं. पण असं पुर्णपणे करणं शक्य होत नाही. माणूस मान्यता आणि तर्क या दोन्ही शक्यतांमध्ये झोके घेत असतो. अनेक असे लोक आहेत जे तारे आणि ग्रहांच्या स्थितीवरुन नशिब आणि आयुष्याच्या संभाव्यता तपासात असतात. विज्ञान त्यांची हेटाळणी करत असतं; पण अमेरिकेसारख्या विज्ञानवादी राष्ट्रात एका महिलेनं ज्योतिष विद्येला प्रतिष्ठा मिळवून दिली होती.

अमेरिकेत ज्योतिष विद्येला विज्ञानाचा दर्जा मिळवून देणाऱ्या एवांगेलिन एडम्स (Evangeline Adams). त्यांच नाव जगभरातल्या प्रसिद्ध ज्योतिषांच्या यादीत सामील आहे. ८ फेब्रुवारी १८६८ साली त्यांचा जन्म अमेरिकेच्या रुढीवादी परिवारात झाला. तीन भावांमध्ये एकटी बहिण असल्याने त्यांच्याकडं विशेष लक्ष दिलं जायचं. एकदा त्या गंभीर आजारी पडल्या. त्यांच्या उपचारासाठी आलेल्या डॉक्टर हॅबर स्मिथ यांना संस्कृत आणि हिंदू धर्माची व्यापक माहिती होती. हॅबर ज्योतिष विद्या आणि चिकित्सा यांच्या एकत्रीत वापर करुन रोगाबद्दल माहिती काढायचे. त्यांनी एवांगेलिन यांची कुंडली बघूनच सांगितलं होतं या जन्मजातच ज्योतिषी आहेत.

यानंतर सुरुवातीच्या काळात ज्योतिष विषयक ज्ञान एवांगेलिन यांनी डॉक्टर हॅबर यांच्याकडूनच घेतलं. नंतर त्यांनी १८९९ ला त्यांनी ज्योतिष विषयक मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यांच्या कुंडलीतल्या उल्लेखाप्रमाणं त्यांनी रहिवास बदलला. त्या न्यूयॉर्कला आल्या. त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्या हॉटेल मालकाला पुढच्या दिवसाबद्दल त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “उद्या १७ मार्च १८९९ ला तुझं मोठं नुकसान होणार आहे.” हॉटेल मालकानं हे ऐकलं नाही. त्यांची भविष्य वाणी चेष्ठेत घेतली. दुसऱ्याच दिवशी जेव्हा सेंट पॅट्रिक दिवस साजरा केला जात होता. त्यादिवशी हॉटेलला आग लागली. हॉटेल जळून खाक झालं.

यात एवांगेलिन तर वाचल्या पण त्यांनी सोबत आणलेलं साहित्य पुर्ण जळालं. पण या नुकसानीचा त्यांना मोठा फायदाच झाला. हॉटेल मालकानं त्यांच्या भविष्यवाणी बद्दल सर्वांना सांगितलं. यामुळं त्यांची प्रसिद्धी लाखो पटीनं वाढली. त्यांच्या सल्ल्यासाठी लोक रोज रांगेत उभे रहायचे. अल्पवधितच त्यांनी जगातल्या सर्वात महाग ठिकाणांपैकी एक असलेल्या न्युयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये स्वतःच कार्यालय सुरु केलं.

एवांगेलिन यांची प्रसिद्धी वाढली तसे विवाद वाढायलाही सुरुवात झाली. त्याकाळी अमेरिकेत ज्योतिष विद्येला अवैध मानलं जायचं. त्यामुळं १९११ आणि नंतर १९१४ ला एवांगेलिन सरकारच्या रडावर होत्या. त्यांना अटक करण्यात आली. प्रकरण कोर्टात गेलं. त्यांनी स्वतःची बाजू मांडतांना कोर्टात अज्ञान व्यक्तीची कुंडली बघून त्या व्यक्तीचा भूत, भविष्य आणि वर्तमान सांगेन असा दावा केला.

न्यायाधीशांनी त्यांना एक कुंडली दिली. त्यांनी ज्योतिष विद्येच्या आधारावर त्या व्यक्तीबद्दल सटीक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की यांच्या मृत्यूच कारण पाण्यात होणारा अपघात ठरेल. हे ऐकून न्यायाधीश अवाक झाले. कारण ती कुंडली त्यांच्याच मुलाची होती जो पाण्यात बुडून मेला होता. न्यायाधीशांनी एवांगेलिन यांच्यावरील केस फेटाळून लावली. आणि निर्णय दिला. “एवांगेलिन यांनी ज्योतिष विद्येला विज्ञानाच्या बरोबरीस आणून ठेवलंय.” घडल्या प्रकरणामुळं अमेरिकेत ज्योतिष विद्येला मान्यता मिळाली आणि एवांगेलिन यांना प्रसिद्धी.

१९२० पर्यंत ज्योतिष विद्येनं त्यांना भरपुर श्रीमंत बनवलं. त्यांच्याकडे जेपी मॉर्गन फर्मचे मालक, चाल्स शुव्याब आणि जोसेफ कँपबेल सारखी लोकं होती. जे. पी. मॉर्गन तर दर महिन्याला ग्रहांची दशा आणि चाल पाहून राजकारण, व्यापार आणि शेअर मार्केट संबंधीत महत्त्वाचे निर्णय घेत असत. अमेरिकेतली प्रसिद्ध अभिनेत्री मॅरी पिक्फोर्ड एवांगेलिन यांना विचारल्याशिवाय एकही चित्रपट स्वीकारत नव्हती.

त्यांनी १९३१ ला भविष्यवाणी केली होती की अमेरिका मोठ्या युद्धात सामील होईल. त्यांची ही भविष्यवाणी ११ वर्षांनंतर खरी ठरली. अमेरिका दुसऱ्या महायुद्धात सामील झाल्यामुळं. त्यांनी ‘अस्ट्रोलॉजी फॉर एव्हरीवन’ या पुस्तकात इंग्लंडच्या राजाबद्दल भविष्यवाणी केली होती. राजा एडवर्ड आठवा याला गादी सांभाळता येणार नाही. त्याच्या पत्नीला राणी होण्याचा मान मिळणार नाही ही भविष्यवाणी केली. हे खरं ठरलं. १९३१ ला एडवर्डनं अमेरिकेतल्या वॅलिस सिम्पसन नावच्या विवाहित महिलेशी लग्न केलं. इंग्लंडच्या कायद्यानूसार असं करणाऱ्या राजाला गादीवर बसण्याचा अधिकार नव्हता. त्यांना गादी सोडावी लागली.

इतरांच्या कुंडल्या पाहून सटीक भविष्यवाणी करणाऱ्या एवांगेलिन यांना कधीच स्वतःच्या लग्नाची कुंडली व्यवस्थीत बघता आली नाही. त्यांचे अनेक विवाह झाले आणि तुटले. नंतर त्यांनी २० वर्ष लहान असणाऱ्या युवकासोबत लग्न केलं. विज्ञानात सर्वात अग्रेसर असणाऱ्या अमेरिकेत एवांगेलिन यांची कारकिर्द बरंच काही देऊन गेली. तर्काच्या पलिकडल्या गोष्टी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button