जातीच्या नावावर जनतेची दिशाभूल करून मताच राजकारण : खा. ओवेसी

vwts

परभणी :- प्रतिनिधी- राज्यात विधानसभा निवडणूकीची धूम चालू असून आश्वासनाची खैरात वाटली जात आहे, आश्वासन व आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार विधानसभेत पाठवा जेणे करून परभणीकरांनी नवीन इतीहास रचावा असे भावनीक आवाहन खा.असदोद्दीन ओवेसी यांनी परभणी येथील दर्गा रोडवरील जाहीर सभेत बोलतांना केले.

दुष्काळामुळे महाराष्ट्रात जवळपास 14,500 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटाबंदीनंतर अनेक छोटेमोठे व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेकांवा बेरोजगारीची वेळ आली आहे. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीका दौराकरून ट्रम्प यांना भेटण्यात धन्यता मानत आहेत. पंतप्रधान मोदी यांना अमेरीका दौर्यातून काय मिळाले असा सवाल करीत भाजपा व शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर नापास झाले असल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला. परभणी विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अली खान मोईन खान यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.9) ओवेसी यांची जाहीर सभा पार पडली.

ही बातमी पण वाचा : महायुती व आघाडीतील बंडखोरीमुळे चौरंगी लढतीचे दुरंगी चित्र

यावेळी खा.इम्तियाज जलील, माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन, रशीद इंजिनिअर, एमआयएमचे उमेदवार अली खान मोईन खान, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.इम्तियाज खान, शहराध्यक्ष शेख अखील, नगरसेवक सय्यद माजीद, नगरसेवक जाकेरलाला, रफीयोद्दीन अशरफी आदी उपस्थित होते.यावेळी ओवेसी म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एक्सा सीव्हील कोड आणण्याचे सांगत आहेत. परंतू फ्रान्सकडून घेतलेल्या विमानासमोर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लिंबू ठेवत असतील एक्सा सिव्हील कोड कसे आणणार असे म्हणत आवेसी टिका केली. तरूणांनी रोजगार किंवा इतर गोष्टींवर प्रश्न विचारले असता त्यांना काश्मीरमधील 370 कलम, पाकिस्तानला धडा शिकवल्याचे सांगितले जाते. मोहन भागवत यांनीही मॉब लिचींगबद्दल केलेले विधान चुकीचे आहे. पंजाब मध्ये झालेल्या शिखांच्या हत्या, 2002मध्ये गुजरातमध्ये झालेल्या घटना मॉब लिंचींग नव्हत्या का ? या शब्दात ओवेसी यांनी भागवत यांच्या विधानावर खडे बोल सुनावले. मुस्लिमांचा दहशतवादाशी कोणताही संबंध नसताना त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचे काम केले जाते. काही लोक काँग्रेस व राष्ट्रवादीची गुलामी करण्यातच धन्यता मानत आहेत.