इथोपियन एअरलाइन्सच्या विमानाचे मुंबईत इमरजन्सी लॅडिंग

Ethiopian Airlines - Emergency Landing - Mumbai Airport

मुंबई : इथोपियन एअरलाइन्सच्या (Ethiopian Airlines) मालवाहू विमानातील हायड्रोलिक सीस्टिम फेल (Hydraulic leakage) झाल्यामुळे त्याचे मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) इमरजन्सी लॅडिंग (Emergency Landing) करण्यात आले. वैमानिकाने प्रसंगावधान राखले नसते तर मोठा अपघात झाला असता.

हे विमान रियादहून बंगळुरूला जात होते. विमानात हायड्रोलिक गळती झाल्याचे वैमामनिकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत मुंबई एअरपोर्टवर विमानाचं सुरक्षित इमरजन्सी लॅडिंग केले.

विमानाच्या इमरजन्सी लॅडिंगसाठी सुरक्षा म्हणून विमानतळावर अग्निशामक दलाचे बंब, मदत वाहन व इतर व्यवस्था करण्या आली होती, असे मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER