
- पुण्यातील मुलीवर दिल्लीत बलात्कार केल्याचा आरोप
मुंबई : ‘ईटी नाऊ’ या वाणिज्यिक वृत्तवाहिनीचे एक ‘अॅकर’ आणि शेअर बाजारांचे विश्लेषक वरुण हिरेमठ (Varun Hiremath) कथित बलात्काराच्या एका प्रकरणात दिल्लीला जाऊन तेथे नियमित जामीनासाठी अर्ज करेपर्यंत ‘ट्रान्सिट बेल’साठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळला आहे.
न्या. प्रकाश डी. नाईक यांनी या संदर्बात दिलेल्या निकालाची प्रत आता उपलब्ध झाली आहे. याचिकाकर्त्यावर बलात्काराचा गंभीर आरोप आहे. सुयोग्य प्रकरणात न्यायालय आरोपीला ‘ट्रान्सिट बेल’ देऊ शकत असले तरी हे प्रकरण तो अधिकार वापरण्यासारखे असल्याचे मला वाटत नाही, असे न्या. नाईक यांनी निकालात म्हटले.
‘ईटी नाऊ’ वहिनीवर दररोज प्रसिद्ध होणार्या ‘मार्केट््स विथ ईटी नाऊ’ या कार्यक्रमाचे २८ वर्षांचे हिरेमठ हे अँकर आहेत. हिरेमठ यांनी गेल्या २० फेब्रुवारी रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात आपल्यावर बलात्कार केला असा आरोप पुण्यातील एका तरुणीने केला आहे. या संबंधीच्या तिच्या फिर्यादीवर दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिसांनी हिरेमठ यांच्यावर भादंवि कलम ३७६ (बलात्कार), ३४२ (सक्तीने डांबून ठेवणे) आणि ५०९ (विनयभंग) या गुन्ह्यांचा ‘एफआयआर’ नोंदविला आहे. फिर्यादी तरुणीने आपली हिच जबानी दंडाधिकाºयांपुढेही नोंदविली आहे. दिल्ली पोलिसांनी हिरेमठ यांच्याविरुद्ध ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली असून त्यांना देश सोडून जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
‘ट्रान्सिट बेल’चा आग्रह धरताना ज्येष्ठ वकील आबाद पोंडा म्हणाले की, हिरेमठ यांना या प्रकरणात निष्कारण गोवण्यात आले आहे. ते या फिर्यादी मुलीला ओळखतही नाहीत. पोलीस आपल्या मागावर आहेत हे त्यांना बातम्यांवरून समजले. हिरेमठ यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचा आहे व त्यांनी त्यांच्या याचिकेत संबंधित पोलीस ठाण्याला प्रतिवादीही केलेले नाही, ्से सांगून अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर एस. एस. पेडणेकर यांनी ‘ट्रान्सिट बेल’ देण्यास विरोध केला.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला