अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी समिती स्थापन

Chhagan Bhujbal

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६,२७ आणि २८ मार्च रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये विविध शासकीय विभागांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या लक्षात घेता सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जात आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्यामुळे या संदर्भात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मुंडावरे यांनी कामही सुरू केले आहे.

शिबिर कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, नितीन मुंडावरे हे मुख्य समन्वयक राहतील. संमेलनाच्या आयोजकांकडून वेळावेळी संबंधित शासकीय विभागांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडून पूर्तता करून घेतील. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करतील. ही एकच समिती संपूर्ण अधिवेशन काळात समन्वयाचे काम करेल, असेही भुजबळ यांनी आदेशात नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER