साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत समितीची स्थापना

Jaiprakash Dandegaonkar

मुंबई :- ऊसतोडणी कामगारांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतर १४ टक्के वाढीसह इतर मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, साखर कारखान्यांच्या कामगारांच्या मागण्या तशाच आहेत. त्या सोडविण्याची मागणी होती. गेली कित्येक महिन्यांच्या वेतनासह वाढीचा प्रश्न प्रलंबित आहेत. या मागण्यांचा अभ्यास करुन त्यावर तोडगा सुचविण्यासाठी कारखान्यांचे प्रतिनिधी, साखर कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी आदी २८ जणांचा समावेश असलेल्या समितीची घोषणा राज्य शासनाने केली. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर (Jaiprakash Dandegaonkar) यांची समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी २०१५ मध्ये त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या करारनाम्याच्या अंमलबजावणीचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे नवीन करारासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सहा महिन्यात ही समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे.

२८ सदस्यांची समिती अशी :
जयप्रकाश दांडेगावकर (अध्यक्ष), सदस्य : श्रीराम शेटे (दिंडोरी), आबासाहेब पाटील (रेणापूर), विजयसिंह मोहिते-पाटील (अकलूज), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), प्रकाश आवाडे (कोल्हापूर), चंद्रदीप नरके ( कोल्हापूर), के. पी. पाटील (कोल्हापूर), राजेंद्र नागवडे (श्रीगोंद), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर), संजय खताळ (लावस्थापकीय संचालक, साखर संघ), बी. बी. ठोंबरे ( कळंब) प्रल्हाद साळुखे (फलटण). कामगार प्रतिनिधी – भाई जगताप, तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, अशोक विराजदार, सुरेश मोहिते, आनंदराव वायकर, सुभाष काकुरते, अविनाश आदिक, नितीन पवार, पोपटराव मिटकरी, योगेश हंबीर, डी. डी. वाघचौरे. शासन प्रतिनिधी : पुणे शासन आयुक्त, कामगार आयुक्त, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे हे सदस्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER