‘मॅक्सी कॅब’ धोरणासंदर्भात समिती स्थापन

Anil Parab - Maxi cab

मुंबई : प्रवाशांची मागणी, नागरिकांची सुविधा आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने वाढती वाहतूक सुविधा, प्रवाशांची सोय या बाबींचा अभ्यास करून दोन महिन्यांत अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली.

राज्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास शासनाने एकाधिकार दिलेले आहेत. यामध्ये सुधारणा करून १९९८ मध्ये मॅक्सी कॅब धोरण वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेस स्थगिती आहे. मॅक्सी कॅब संवर्गातील वाहनांना परवाने देण्यात येत नाही. देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही, अपघाताचे प्रमाण कमी कसे करता येईल, यासाठी परिवहन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER