विकास महामंडळ स्थापन करा : राज्यस्तरीय ब्राह्मण गोलमेज परिषद

राज्यस्तरीय ब्राह्मण गोलमेज परिषद

कोल्हापूर : स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ ( Vikas Mahamandal) स्थापन करावे, पुरोहितांना मानधन द्यावे, ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याक दर्जा (Brahmin Round Table Council) मिळावा, अशा विविध मागण्या ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आल्या. काल, रविवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय ब्राह्मण गोलमेज परिषदेत १४ ठराव मांडण्यात आले.

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद आणि ब्रह्म महाशिखर परिषद यांच्या विद्यमाने ब्राह्मण समाजाची गोलमेज परिषद कोल्हापुरात झाली. सुरुवात दीपप्रज्वलन आणि त्यानंतर महिला सदस्यांनी अथर्वशीर्षान परिषदेला सुरुवात झाली. सुरुवातीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी १४ ठराव मांडले. यामध्ये ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, पुरोहितांना मानधन देणे, वर्ग -२ इनामी जमिनी वर्ग -१ करून खासगी मालकीच्या करून देणे, महापुरुषांच्या बदनामी विरोधी कायदा करणे, शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देणे, पुण्यातील दादोजी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुन्हा बसवणे, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन येथे स्मारक उभारणे, जिल्हास्तरावर ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणे, पंढरपूर विठ्ठल वरुक्मिणी मंदिरात बडवे उत्पात यांना पुन्हा सेवेकरी म्हणून रुजू करून घेणे या मागण्यांचा समावेश आहे. राज्यभर गोलमेज परिषदा ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी यापुढे राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच राज्यभर गोलमेज परिषदांचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER