पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा; उद्धव ठाकरेंनी उडवली भाजपाची टिंगल

CM Uddhav Thackeray - BJP

मुंबई : नेपाळ (Nepal) आणि श्रीलंकेत (Sri Lanka) सत्ता स्थापन करणार, असे म्हणतात. हिंमत असेल तर पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा. मग आम्ही तुमचे स्वागत करू, भाजपाची अशी टिंगल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उडवली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते बिप्लबकुमार देब (Biplab Kumar Deb) काही दिवसांपूर्वी म्हणाले होते – भाजपाने केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही विस्तार करण्याची योजना आखली आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपाचे सरकार स्थापन करण्याची योजना शहांकडे आहे!

आज मुंबईतील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोमणे मारलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER