जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ७ ते ११ या वेळेतच सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

CM Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात वाढत्या कोरोनाची (Corona) आकडेवारी लक्षात घेता संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून नवे निर्बंध लादण्यात आले आहेत. सरकारने कठोर निर्बंध केले असतानाही दुकानांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नव्या आदेशानुसार आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहणार आहेत. २० एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १ मेच्या सकाळी ७ पर्यंत हे नवे नियम असणार आहेत.

राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, चिकन, मटण, अंडी, मांस, कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, इत्यादी संबंधित सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहतील. विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. याच मोहिमे अंतर्गत सरकारने आता नवी नियमावली जारी केली आहे. सगळ्या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे.

मात्र, कोरोनाची स्थिती पाहून या संदर्भातला निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या या नियमावलीबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी सरकार पूर्णपणे भांबावले असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘सरकार पूर्णपणे भांबावले आहे. चार तासांत सगळी गर्दी एकवटणार आहे. त्या गर्दीचे नियोजन काय आहे? घरपोच माल पोहचवण्याची व्यवस्था हवी होती. यामुळे दुकानदारही नाराज होणार आहेत.’

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button