चीनसाठी हेरगिरी; दिल्लीत पत्रकाराला अटक

Journalist arrested in Delhi

दिल्ली : चीनसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी एका मुक्त पत्रकारास अटक केली आहे. या पत्रकारासोबत एक महिला व अन्य एक पुरूषास देखील सांनी अटक केली आहे.

दिल्लीमधील पीतमपुरा भागातील रहिवासी राजीव शर्मा मुक्त पत्रकार (फ्रिलान्स जर्नलिस्ट) आहेत. राजीव शर्मा यांच्या घरातून पोलिसांनी देशाच्या सुरक्षेशी निगडीत अनेक गोपनीय कागदपत्रे जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजीव शर्मा यांना अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत (ऑफिशियल सीक्रेसी अॅक्ट) अटक करून, तपास सुरू केला आहे. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दिल्ली पोलिसांचा आरोप आहे की, पत्रकार राजीव शर्मा यांनी चिनी गुप्तचर संस्थांना देशाच्या सुरक्षेशी निगडीत संवेदनशील माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शर्मा यांच्यासोबत एका चिनी महिलेसह तिच्या नेपाळी सहकाऱ्यास देखील अटक केली आहे. हे दोघे कंपन्यांच्या माध्यमातून शर्मा यांना मोठ्याप्रमाणावर पैसा पुरवत होते. त्यांचीही चौकशी सुरू आहे.

शर्मा यांच्या हेरगिरीबाबत संशय आल्यानंतर दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल राजीव शर्मा यांच्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवून होता. त्यांचे कॉल डिटेल्स देखील गोळा करत होता. न्यायालयाने शर्मा यांना सहा दिवसांसाठी पोलीस कोठडी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER