मध्यप्रदेशात ‘एस्मा’ लागू

shivraj singh

भोपाळ :- लॉकडाऊनच्या काळात व नंतरही कोरोनाच्या आपातस्थितीत सेवा सुरळीत राहाव्यात म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी राज्यात एस्मा (ESMA – Essential Services Maintenance Act) अर्थात ‘अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा’ किंवा ‘जीवनावश्यक कायदा’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवराजसिंह चौहान यांनी स्वतः या निर्णयाची माहिती दिली. ‘नागरिकांचं हित ध्यानात घेता योग्य व्यवस्थापनासाठी सरकारनं राज्यात तत्काळ एस्मा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे’ असे ट्विट केले.

मध्यप्रदेशात आतापर्यंत कोरोनाचे ३२७ रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक १७३ केवळ इंदोरमध्ये आढळलेत. राज्याची राजधानी भोपाळमध्ये ९१ रुग्ण आढळलेत, त्यात आरोग्य विभागाच्या ४५ आणि १२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


Web Title : ESMA is applicable in madhya pradesh

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)