कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक ; निरंजनी आखाड्याने केली कुंभ समाप्तीची घोषणा

Kumbha Mela - Maharastra Today
Kumbha Mela - Maharastra Today

हरिद्वार : हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये दुसऱ्या शाही स्नान पर्वाचे औचित्य साधत मोठ्या संख्येने साधू-संत गंगा नदीत स्नान करताना दिसले. यामध्ये साधारण ४८ लाख भाविक सहभागी झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असताना कुंभमेळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४ दिवसात कुंभमेळ्याच्या परिसरातील १७०० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हाच वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता कुंभमेळा समाप्तीची चर्चा होताना दिसतेय.

गुरूवारी झालेल्या चर्चेदरम्यान, निरंजनी आखाड्यानं समाप्तीची घोषणा केली आहे. ‘कोरोनाचा वाढता संसर्ग बघता आखाड्यानं उद्या, १७ एप्रिल रोजी कुंभ मेळा समाप्त करण्यात येणार आहे’, असे आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी सांगितले आहे. यासह कोरोना गंभीर स्थिती पाहाता लोकांच्या आरोग्यासाठी कुंभ समाप्तीची घोषणा करणे आवश्यक आहे, यामुळे इतर आखाड्यांनाही मेळा समाप्त करण्याचं आवाहन पुरी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button