आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडून 80 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

Covid Center Beds -MLA Shivendra Raje

सातारा : आ. शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje), सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने 80 बेडचे (80 beds) सुसज्ज असे कोव्हिड केअर सेंटर (Covid Center) उभारले आहे. या सेंटरमध्ये 40 बेड (40 Beds) हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सज्ज असतील.

सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली असून बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे.जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या परिस्थितीला आळा बसावा व रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी 80 बेडचे कोविड केअर सेंटर उभारले असून बुधवार दि. 9 सप्टेंबर रोजी ते प्रशासनाकडे सुपूर्द केले जाणार आहे. साताऱ्यात ऑक्सिजन बेड नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने कोरोना पेशंट दगावत आहेत. ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर्स असणारी कोविड हॉस्पिटलस् उभे करण्यासाठी अथवा ऑक्सिजन बेडस् प्रशासनाला पुरवण्यासाठी दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे.