डॉक्टरांना समान वेतन देण्याची आ. निरंजन डावखरे यांची मागणी

Niranjan Davkhare

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी : कोरोना संकटकाळात राज्याच्या कानाकोपऱ्यात एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर कोविड योद्धे म्हणून खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणेच सर्व डॉक्टरांना समान वेतन द्यावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

समान काम समान वेतन या तत्वावर एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस डॉक्टरांना समान वेतन देणे गरजेचे आहेत. यापूर्वी राज्य सरकारने बंधपत्रित कंत्राटी डॉक्टरांना भरीव वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बीएएमएस व बीएचएमएस पदवीधारक कंत्राटी डॉक्टरांना वगळण्यात आले. तरी राज्य सरकारने सहानुभुतीपूर्वक निर्णय घेऊन सर्व डॉक्टरांना समान वेतन देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER