ग्रेटा ‘टूलकिट’प्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ता दिशा रवि ताब्यात

Disha Ravi Arrested

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या ‘टूलकिट’प्रकरणी कारवाई केली आहे. पर्यावरण कार्यकर्ता आणि विद्यार्थी असलेली दिशा रविला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यावर शेतकरी आंदोलनासंदर्भात असलेल्या ‘टूलकिट’मध्ये बदल केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी ४ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला होता.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधावे म्हणून आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीला हिंसक वळण आले. सरकारने दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी इंटरनेट सेवाही बंद केली होती. याप्रकरणी पॉपस्टार सिंगर रिहानासोबतच ग्रेटा थनबर्गने ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. ग्रेटाने ‘टूलकिट’ ट्विट केली होती. नंतर ती डिलीट करण्यात आली.

‘टूलकिट’ या प्रकरणात बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात राहणारी दिशा रविला पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करून त्यात आणखी मुद्दे समाविष्ट केल्याचा आणि ते पुढे पाठवल्याचा दिशावर आरोप आहे.

हवामान बदलाच्या मुद्द्यावरून ग्रेटा थनबर्गने शाळेत संप केला होता. २०१८ पासून जागतिक पातळीवर हवामान बदलांविरुद्ध चळवळ उभी राहिली आहे. हवामान बदलांशीसंबधित ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या अभियानाची दिशा संस्थापक सदस्य आहे. दिशाची पोलिसांनी चौकशी केली. ‘टूलकिट’मध्ये बदल केल्याची कबूली केल्याचे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER