उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, सरकारने काय केले? बाळा नांदगावकरांचा प्रश्न

Bala Nandgaonkar

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) कठीण काळात, कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन नोकर कपात किंवा पगार कपात करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले होते. अनेक उद्योजकांनी त्या कठीण काळात नोकर कपात न करता कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार दिलेत. पण, सरकारच्या एस. टी. महामंडळाने मात्र दोन महिन्यांपासून ९८ हजार कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाहीत. यावरून मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी प्रश्न विचारला – उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, सरकारने काय केले?

पगार मिळाले नाहीत म्हणून दिवाळीच्या तोंडावर निराश झाल्याने आज रत्नागिरी एसटी डेपोचा एक चालक पांडुरंग गडदे व जळगाव आगारातल्या मनोज अनिल चौधरी या वाहकाने आत्महत्या केली. या संदर्भात बाळा नांदगावकर यांनी ट्विट केले – पहिला लॉक डाउन लागल्या नंतर काही काळाने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील उद्योगपतींना आवाहन केले की त्यांनी नोकरकपात अथवा पगार कपात करू नये, त्याला प्रतिसाद देऊन अनेक खासगी उद्योगांनी अतिशय कठीण काळात देखील अशी कपात टाळून वेळेवर पगार देऊन आदर्श निर्माण केला, आणि शासन च जर 98000 एस टी कर्मचाऱ्यांना 2 महिने झाले तरी पगार देत नसेल तर त्यांनी जगावे तरी कसे? तातडीने पाऊले उचलून ह्या 2 महिन्यांचे पगार करून त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. हा केवळ 98000 जणांचा नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबाचा देखील प्रश्न आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारविरुद्ध ३०२ कलमाखाली गुन्हा नोंदवा; प्रवीण दरेकरांची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER