राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे “बाजारात तुरी” ; मी भाजपातच समाधानी : बापू पठारे

NCP - Bapu Pathare

मुंबई : राष्ट्रवादी (NCP) प्रवेश म्हणजे “बाजारात तुरी” या म्हणी सारखा असल्याचे मत भाजपमधील (BJP) माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी व्यक्त केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अतिशय नाट्यमयरित्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ 14 ऑक्टोबर 2019 रोजी वडगावशेरी- खराडी- चंदननगर परिसरात अजित पवार (Ajit Pawar) यांची सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती.

पठारे हे भाजपमध्ये नाराज आहेत अशा प्रकारची चर्चा सातत्याने होत आहे. ते पुन्हा स्वगृही परतणार अशा अनेकवेळा चर्चा झाल्या. त्यातच, बापू पठारे हे लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हमजे अजित पवारांसोबत त्यांची बैठक झाल्याचे वृत चर्चेत आहे, पण ते वृत्त निराधार असून त्यात काही तथ्य नसल्याचे बापू पठारे यांनी म्हटले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मी एकदाही अजित पवार यांना भेटलो नसून विरोधकांकडून मुद्दाम खोट्या, दिशाभूल करणाऱ्या अफवा व बातम्या पसरविल्या जात आहेत. मी भाजपमध्ये समाधानी आहे, असे पठारे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER