‘माझा डॉक्टर्स’ बनून मैदानात उतरा; आपण तिसरी लाट परतवू : उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आज सुमारे ७०० खासगी डॉक्टरांना कोरोनातील वैद्यकीय उपचारांबाबत काही विशिष्ट पद्धतींचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आणि त्यांचे अनेक शंका दूर केल्या. तीन-चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने ३०० डॉक्टर्सशी संवाद साधला होता. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून १ हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला. अशाच रीतीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधणार आहेत.

‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात यावे

बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी वैद्यकीय क्षेत्राचे कौतुक केले आणि तिसर्‍या लहरीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, “कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण ‘माझा डॉक्टर’ बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होईल.”

कोविड केंद्रांमध्येही सेवा द्या

आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना आपल्या सेवेची गरज आहे, हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी आपली नावे नोंदवावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात सर्वत्र उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे फार महत्वाचे आहे. राज्यात १ हजार २७० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जातो. मात्र, सध्या १ हजार ७०० मेट्रिक टनापर्यंत आपली गरज वाढली आहे. आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

लहान मुलांकडे लक्ष द्या

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका आहे. हा धोका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे. तसेच लहान मुलांच्या वारात्नुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे, अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button