‘आता बस झालं, आजच्या आज ऑक्सिजनचा पुरवठा करा !’ उच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

Delhi High Court - Oxygen Cylinders

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आज राजधानी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात  दुपारी ऑक्सिजनअभावी (Oxygen) डॉक्टरसह आठ  रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेचे पडसाद आज दिल्ली उच्च न्यायालयात पडताना दिसले. आज ऑक्सिजनच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) केंद्र सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. “आता पाणी डोक्याच्या वरून गेलं आहे. आता आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. तुम्ही आता सगळ्याची व्यवस्था करणार आहात.

काहीही करून दिल्लीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे. ” असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेत. दिल्लीच्या बत्रा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन  पुरवठ्याअभावी आठ  रुग्णांसह एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून जाहीर केलेला साठादेखील पुरवला जात नसल्याची बाजू राज्य सरकारने मांडली आहे.

यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात रोज सुनावणी सुरू असून त्यामध्ये दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारांना न्यायालयाने वेळोवेळी सुनावले. न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित विभागाच्या सचिवांना न्यायालयासमोर हजर राहावं लागेल. याशिवाय न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईदेखील करण्याचा आम्ही विचार करू, असा इशाराही न्यायालयाने दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button