व्हॅलेंटाईन डेनिमित्त अमृता फडणवीस यांनी गायले इंग्रजी गाणे

Amrita Fadnavis for Valentine Day

मुंबई :- माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक इंग्रजी गाणे गायले आहे. अमृता यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अमृता फडणवीसांनी १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेनिमित्त गायलेल्या गाण्याचा मुळ गायक lionel richie आहे. या २ मिनिटे १७ सेकंदाच्या अल्बममध्ये अमृता यांनी स्वत:च्या अंदाजात गाणे गायल्याचे दिसत आहे.

मात्र, येथेही त्यांच्या विरोधक आणि ट्रोलर्सनी त्यांना ट्रोल करण्याची संधी सोडलेली नाही. ट्रोल करताना थेट एक्सिस बॅंकेचा आणि उद्धव ठाकरेंच्या निर्णयाशीही ट्रोलर्सनी संबंध जोडला आहे.

उद्धव ठाकरेजी @AxisBank वर कारवाई करून तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाहीत; उलट आम्ही आधीपेक्षा अधिक सुरेल गाऊ, असं आपल्याला या गाण्याच्या माध्यमातून सांगायचे तर नाही, अशी टीका ट्रोलर्सकडून करण्यात येत आहे.