इंग्लिश काउंटीजचा प्रस्ताव, आयपीएलचे उरलेले सामने आमच्याकडे खेळवा

IPL 2021

कोरोनाच्या लाटेमुळे आयपीएल 2021 (IPL 2021) अर्ध्यातच स्थगित करावी लागली. अजुनही निम्मे सामने बाकी आहेत आणि हे सामने कधी व कुठे होतील याबद्दल अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडमधील काही काउंटी क्रिकेट क्लब्जनी (County Cricket Clubs) आयपीएलचे उर्वरीत सामने आयोजित करायची तयारी दर्शवली आहे. यंदा सप्टेंबरमध्ये हे सामने इंग्लंडमध्ये आयोजित करता येऊ शकतात असा या काउंटीजचा प्रस्ताव आहे. दी मेरिलेबोन क्रिकेट क्लब (MCC), सरे, वाॕर्विकशायर, ओव्हल आणि एजबॕस्टन यांनी यासंदर्भात इंग्लिश क्रिकेट मंडळ (ECB) ला पत्र लिहिले आहे त्यात त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ला हा प्रस्ताव द्यावा असे म्हटले आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात हे सामने दोन आठवड्यात होऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे.

ओल्ड ट्रॕफोर्ड मैदान ज्यांचे आहे त्या लँकेशायरने या प्रस्तावावर सहमती दर्शवलेली नाही पण आपले मैदान वापरण्यास हरकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या राष्ट्रीय मुख्याधिकाऱ्यांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

इंग्लंडमध्ये आयपीएलचे उर्वरीत सामने झाले तर आघाडीच्या खेळाडूंना टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी चांगला सराव होईल आणि जर युएईमध्ये विश्वचषक स्पर्धा होणार असेल तर तेथील खेळपट्ट्या आयपीएल इंग्लंडमध्ये होण्याने ताज्या राहतील असा दावा करण्यात आला आहे. मात्र इसीबीच्या प्रवक्त्याने म्हटलेय की बीसीसीआय आयपीएलच्या सामन्यांसाठी पर्यायी ठिकाण शोधतेय अशी आमची माहीती नाही.

आयपीएल युएईमध्ये होवौ किंवा इंग्लंडमध्ये, दररोज दौन सामने आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत होतील अशी शक्यता आहे. शिवाय कोणत्याही खंडाशिवाय दररोज सामने होतील अशी चिन्हे आहेत. भारतीय संघ त्याच्याआधी इंग्लंड दौऱ्यावरच राहणार आहे त्यामुळे प्रवास व क्वारंटीन अशा भानगडी कमी राहणार आहेत ही आणखी एक जमेची बाजू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button