इंग्लंडकडून 358 धावांचा यशस्वी पाठलाग

पाकिस्तानवर सहज विजय, बेरस्टोचे विजयी शतक, इमाम उल हकच्या 151 धावा व्यर्थ

england wins high scoring match against pakistan

ब्रिस्टॉल, इंग्लंड :- पाकिस्तानच्या इमाम उल हक याने 151 धावांची सर्वोच्च खेळी करूनही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला सहा गडी आणि 31 चेंडू राखून सहज मात दिली . पाकिस्तानच्या 9 बाद 358 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 31 चेंडू शिल्लक असतानाच फक्त चार गडी गमावून पार केले.

93 चेंडूत 15 चौकार व 5 षटकारांसह 123 धावा करणारा जॉनी बेरस्टो हा इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सलामीच्या त्याचा साथीदार जेसन रॉय याने 55 चेंडूतच 76 धावा करून त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी 17.3 षटकात १५९ पण धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. बेरस्टोचे हे सातवे वनडे शतक होते .

त्यानंतर जो रुट याने सुद्धा आक्रमक खेळ करत इंग्लंडचा विजय निश्चित केला. त्याने 36 चेंडूत 43 धावा केल्या. तिसऱ्या सामना अखेर इंग्लंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आता दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडचे क्षेत्ररक्षण खराब झाले. जसन रॉयचा एकवेळ 21 धावांवर झेल सोडला जो त्यांना महागात पडला. 36 चेंडूत 43 धावा करणाऱ्या मोईन अली याला सुद्धा जीवदान लाभले. त्यामुळे पाकिस्तानच्या साडेतीनशे वरच्या धावांचे लक्ष्य इंग्लंडने सहज गाठले.

पाकिस्तानसाठी फखर झमान व बाबर आझम झटपट बाद झाल्यावर इम्रान ताहीरने त्यांच्या धावसंख्येला आकार दिला. 41 चेंडूत 41 धावा करणाऱ्या हॕरिस सोहेल याने त्याला साथ दिली. सॕम करन याने पायाने चेंडू स्टॅम्पवर फेकत हॅरिस सोहेलला धावबाद केले. त्यानंतर पाकिस्तानचे गडी ठरावीक अंतराने बाद होत गेले. आसिफ अलीने 43 चेंडूत ५२ धावा केल्या. इमाम उल हक याने शंभर ते दीडशे धावांचा टप्पा फक्त एकतीस चेंडूतच गाठला. त्यानेच पाकिस्तानच्या धावसंख्येला आकार दिला. टॉम करन याने त्याला त्रिफळा बाद केले