इंग्लंड पुन्हा एकदा रिकाम्या हाती मायदेशी

England returns home empty handed once again

भारताने (India) निसटता का होईना तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी पुण्यात (Pune) 7 धावांनी जिंकला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. यासह भारताने इंग्लंडविरुध्दची (England) कसोटी, टी-20 आणि वन डे अशा तिन्ही मालिका जिंकण्याची हॕट्ट्रीक (Hattrick) साधली तर इंग्लंडचा संघ भारतातून पुन्हा एकदा रिकाम्या हाती परतला.

या दोन संघातील वन डे मालिकांपुरतेच (ODI Series) बोलायचे झाले तर इंग्लंडचा संघ 1984-85 पासून भारतात वन डे सामन्यांची मालिका जिंकू शकलेला नाही. 1984-85 मध्ये त्यांनी मालिका 4-1 अशी जिंकली होती.

या दोन संघात भारतात ज्या 10 मालिका वन डे सामन्यांच्या खेळल्या गेल्या त्यापैकी 7 भारताने जिंकल्या आहेत. एकच इंग्लंडने जिंकली तर दोन मालिका बरोबरीत राहिल्या आहेत.

याप्रकारे इंग्लंडच्या संघाला भारतात वारंवार ‘लगान’ वसूल करण्यासाठी आल्यावर रिकाम्या हातीच परतावे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button