सलग पाचव्या मालिकेत इंग्लंडने गमावला पहिला सामना

England lost the first match

इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुध्दचा पहिला कसोटी सामना रविवारी चार गडी राखून गमावला. साउथम्पट्नच्या या पराभवासह इंग्लंडने मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावण्याची आपली परंपरा पुढे चालवली आहे. सलग पाचव्या कसोटी मालिकेत (दोन किंवा अधिक सामने) त्यांनी पहिला कसोटी सामना गमावला आहे.

पहिला कसोटी सामना गमावलेल्या चार मालिकांपैकी ते केवळ एकच मालिका जिंकले आहेत. दोन गमावल्या तर ऑस्ट्रेलियाविरुध्दची मालिका त्यांनी बरोबरीत सोडवली आहे.

जानेवारी 219 पासून इंग्लंडची ही पहिला सामना गमावण्याची मालिका सुरू झाली आहे. विंडीजविरुध्दचा पहिला सामना ब्रीजटाउन येथे त्यांनी 381 धावांनी गमावला.ही मालिका त्यांनी 0-2 गमावली. त्यानंतर ॲशेस मालिकेतील पहिला सामना त्यांनी बर्मिंगहॅम येथे 251 धावांनी गमावला पण मालिका 2-2 बरोबरीत सोडवली. न्यूझीलंडविरुध्द माउंट मोंगानुई येथील सामन्यात ते एक डाव आणि 65 धावांनी पराभूत झाले. ही मालिका इंग्लंडने 0-1 गमावली. यानंतर दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन कसोटीत ते 107 धावांनी पराभूत झाले पण ही मालिका त्यांनी 3-1 जिंकली.

त्यानंतर आता इंग्लंडने पुन्हा एकदा मालिकेतील पहिला सामना गमावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER