इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना पसंत आहे महिलांचे परफ्युम, बेन स्टोक्सने दिली चकित करणारी माहिती

Ben Stokes - Maharastra Today

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण इंग्लंडच्या (England) संघातील जवळपास सर्वच क्रिकेटपटू महिलांसाठीचे परफ्युम वापरतात. ही ऐकीव माहिती नाही तर इंग्लंडच्या संघाचा कणा असलेला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने ही माहिती दिली आहे त्यामुळे यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे. सामन्याच्या आधी मी एकटाच नाही तर आम्ही सर्वच महिलांसाठीचे परफ्युम (Perfume) वापरुन मैदानात उतरतो असे स्टोक्सने एका कार्यक्रमात बोलताना उघड केले आहे.

स्टोक्सने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये पुरुषांच्या परफ्युमपेक्षा महिलांच्या परफ्युमला अधिक पसंती आहे.यामागचे कारण स्पष्ट करताना त्याने सांगितले की, महिलांच्या डिओडोरंटचा सुगंध पुरुषांच्या तुलनेत चांगला असतो म्हणून आम्ही तसे करतो. त्याला स्वतःला डाळिंबी सुगंधाचा (pomegranate scent) डियो आवडतो आणि इंग्लंडच्या संघातील बहुतांश खेळाडूंनाही हाच सुगंध आवडतो अशी चकित करणारी माहिती त्याने दिली. डाळिंबी सुगंध छानच असतो अशी पुष्टीही त्याने जोडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button