इंग्लंडचे क्रिकेटपटू मायदेशी पोहचले; ऑस्ट्रेलियन्स अजूनही मार्गाच्या शोधात

Jos Buttler

आयपीएलचा (IPL) डाव अर्ध्यातच मोडल्यावर परदेशी खेळाडू, विशेषत: ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडू मायदेशी कसे परततील याबद्दल समस्या असताना इंग्लंडचे (England) आठ खेळाडू मायदेशी पोहचले आहेत. त्यात जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्ज, ख्रिस वोक्स, मोईन अली आणि जेसन रॉय यांचा समावेश आहे तर ओईन मॉर्गन, डेव्हीड मालन व ख्रिस जॉर्डन हे येत्या दोन दिवसांत मायदेशाकडे प्रयाण करणार आहेत.

इंग्लंडमध्ये पोहचलेल्या आठ खेळाडूंना नियमानुसार तिकडे १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यानंतरच ते आपापल्या घरी परतू शकणार आहेत.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू मात्र मायदेशी कसे परतता येईल या चिंतेत असून ते सध्या मालदीवमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मेपर्यंत भारतातून परतणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे आणि त्यात कोणतीही सवलत देण्यास त्यांचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नकार दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेसुद्धा तशी मागणी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू दिल्लीत एकत्र येऊन तेथून मालदीवकडे प्रयाण करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button